loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात ८ मार्च रोजी महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धा

मालवण (प्रतिनिधी) - ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने महिला दिनानिमित्त आणि स्व. नेहा कोळंबकर-शंकरदास यांच्या स्मरणार्थ महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन २०२६ - रन फॉर हेल्थ या स्पर्धेचे आयोजन दि. ८ मार्च रोजी मालवण येथे करण्यात आले आहे. यावर्षी या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून फक्त महिलांसाठी आहे. स्पर्धा सहा गटामध्ये होणार असून यामध्ये पहिला गट-१०ते १५ वयोगट (२किमी), दुसरा गट-१६ ते २५ वयोगट(२ किमी), तिसरा गट- २६ ते ३५ वयोगट(२ किमी), चौथा गट- ३६ ते ४५ (२किमी), पाचवा गट - ४६ ते ५५ (चालणे, धावणे दोन्ही ग्राह्य असेल) (२किमी), सहावा गट - ५६ वर्षा पुढील महिला - चालणे, धावणे दोन्ही ग्राह्य असेल) (२किमी). स्पर्धकांनी आधारकार्ड घेऊन येणे आवश्यक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि. ८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता ही स्पर्धा होणार असून रिपोर्टींग टाईम सकाळी ६.३० वाजता असेल. या स्पर्धेचा मार्ग मालवण देऊळवाडा सागरी महामार्ग ते कोळंब पुल सागरी महामार्ग असा २ किमी अंतराचा आहे. पहिले ४ गट धावणे व पाचवा आणि सहावा गट (४६ ते ५६ वर्षापुढील ज्येष्ठ महिला) या वयोगटातील महिलांसाठी चालणे, धावणे दोन्ही ग्राह्य असेल. प्रत्येक गटासाठी - प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच पहिला उत्तेजनार्थ आणि दुसरा उत्तेजनार्थ अशा प्रथम पाच क्रमांकांच्या महिलांना आकर्षक चषक, मेडल व सन्मानपत्र स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व मेडल दिले जाईल. नावनोंदणी ७ मार्च पर्यंत करावी, नोंदणीसाठी राधा केरकर (9021163580), वृषाली धुरी (9420437657), अनुष्का चव्हाण, पल्लवी खानोलकर, कविता वेंगुर्लेकर, अंजली आचरेकर, सुविधा तिनईकर, सिद्धी बांदेकर, कोमल चव्हाण, पूजा तळाशीलकर, वैशाली शंकरदास यांच्याशी संपर्क साधावा तसेच बहुसंख्य महिला, तरुणी, युवती यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg