loader
Breaking News
Breaking News
Foto

मिडल-ईस्ट युद्धाचा सर्वसामान्य भारतीयांना फटका, एलपीजी सिलिंडरमध्ये दरवाढ

मध्यपूर्वेच्या युद्धाची आग आता हळूहळू जगभर पसरू लागली आहे. इराण आणि इस्रायल एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत, तर दुसरीकडे इराण-इस्रायल युद्धाच्या वणवा भारतातही पसरला आहे. लोक साखर झोपेत असताना तेल कंपन्यांनी सर्वसामान्य लोकांना दुहेरी धक्का दिला आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य भारतीयांना महागाईचे चटके बसले आहेत. IOCL म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 60 रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 115 रुपयांनी वाढ केली आहे. नवीन एलपीजी सिलिंडरचे दर तात्काळ लागू झाले असून दरवाढीचा थेट परिणाम थेट परिणाम स्वयंपाकघराच्या बजेट तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यवसायांवर होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) च्या वेबसाइटनुसार, शनिवारी 7 मार्चपासून विनाअनुदानित एलपीजी 60 रुपयांनी महागले आहे. म्हणजे आता नवीन दरानुसार, 14.2 किलोचा सिलिंडर मुंबईत 912.50 रुपयांना मिळेल, जो याआधी 852.50 रुपयांना मिळायचा. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत ही दुसरी किंमत वाढ असून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर 300 रुपयांचे अनुदान मिळत राहील. सध्या भारतातील 10 कोटींहून अधिक कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेचा फायदा मिळत आहे.

टाईम्स स्पेशल

दुसरीकडे गेल्या काही महिन्यानंतर पहिल्यांदाच घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे तर, या वाढीचा व्यवसायांवरही परिणाम होणार आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115 रुपयांनी वाढली असून ANI या वृत्त संस्थेनुसार मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचा भाव आता 1,720.50 रुपयांवरून 1,835 रुपये होईल. एप्रिल 2025 नंतर घरगुती एलपीजीच्या किमतींमध्ये पहिल्यांदाच मोठा बदल करण्यात आला असून नवीन वाढीचा परिणाम घरगुती ग्राहक आणि दैनंदिन कामकाजासाठी एलपीजीवर अवलंबून असलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक आस्थापनांवर होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg