loader
Breaking News
Breaking News
Foto

'रुग्णालयात अचानक आला संकासूर.... सोशल मीडियावर कौतुकाचा महापूर'

रत्नागिरी - रत्नागिरी येथील सर्व रुग्णांना संजीवनी ठरत असलेल्या निलेश सांबरे यांनी स्वखर्चातून स्थापन केलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचलित भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरी येथे अचानक संकासुराने भेट दिली आणि रुग्णालयातील वातावरणात आनंदासह भक्तिमय साज चढला. महोत्सवाच्या रणधुमाळीत संपूर्ण कोकण रंगलेला असताना आपल्या रुग्णालयातील रुग्णांनाही या आनंदापासून वंचित राहता कामा नये याकरता श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या व्यवस्थापन टीमने हा स्तुत्य निर्णय घेत आपल्या रुग्णांची शंकासुरासमवेत अनोखी भेट घडवून आणली. या संपूर्ण भेटीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रुग्णालयात आलेल्या संकासुराने रुग्णांना आशीर्वाद दिले, लहानग्यांसोबत खेळ खेळले आणि रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या शैलीत धीर देखील दिला. जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे सर्वसामान्य माणसांच्या हिताचे मोफत उपक्रम राबवून सातत्याने या संपूर्ण कोकणात काम करत आहेत. रुग्ण व संकासुराची भेट म्हणजे सेवा आणि परंपरा यांचा अनोखा मिलाप ठरला. सांबरे यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होतंय....कोकणातील पवित्र संस्कृतीची परंपरा या रुग्णालयाने जोपासली, असंच म्हणावं लागेल..... रुग्णालयातील बेडवर असलेल्या रुग्णांच्या चेहर्‍यावर उमललेलं हसू आणि आनंद हाच आमचा शिमगोत्सव, अशी प्रतिक्रिया निलेश सांबरे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg