रत्नागिरी - मिरकरवाडा समुद्रात तडीवरच एलईडी प्रकाशातील बेकायदेशीर मासेमारी सिमाशुल्क विभागाच्या गस्ती पथकाने उघडकीस आणली. एलईडी लाईट लावून समुद्रात मासेमारीसाठी जात असणाऱ्या ‘वन स्टार’ नावाची मच्छिमार नौका (क्र.इंडिया-एमएच4एमएम5137) सिमाशुल्क विभागाच्या गस्ती पथकाने पकडून सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या ताब्यात दिली आहे. ही नौका भगवती बंदर येथे अटकावून ठेवण्यात आली आहे. जानेवारी महिन्यापासून यांत्रिकी मासेमारी नौकाना सुधारित सागरी मासेमारी अधिनियमानुसार साडेबारा नॉटीकल बाहेर समुद्रात जावून मासेमारी करता येते. राज्याच्या समुद्र क्षेत्रात म्हणजेच साडेबारा नॉटीकल मैलच्या आत मासेमारी करण्यास बंदी आहे. अशावेळी सिमाशुल्क विभागाने पाच ते सहा नॉटीकल मैलच्या आत ही वन स्टार नौका पकडली आहे. सिमाशुल्क विभाग किंवा कस्टमची गस्ती नौका सकाळी 11.45 वा.च्या सुमारास गस्तीसाठी जात असताना त्यांना वन स्टार ही नौका एलईडी लाईट लावून जात असताना दिसून आली. या गस्ती पथकाने ही नौका पकडून मिरकरवाडा बंदरात आणून सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. ही नौका भगवती बंदरात अटकावून ठेवण्यात आली असून सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या न्यायालयात यासंदर्भात प्रतिवेदन दाखल करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वन स्टार ही नौका अनिस नाखवा यांच्या मालकीची असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दिवसाढवळ्या एलईडी लाईट लावून जाणारी ही नौका कस्टमच्या गस्ती पथकाने पकडल्याने मिरकरवाडा समुद्रात बेकायदेशीर एलईडी मासेमारी जोरात सुरू असतानाही मत्स्य व्यवसाय विभागाकडून दखल का घेतली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेकायदेशीर एलईडी मासेमारीवर नियंत्रण रहावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भातील कारवाईकडे दुर्लक्ष झाले तर पारंपारिक आणि पर्ससीन नेट मच्छिमारांचे पुन्हा द्वंद्व सुरू होण्याची भिती आहे.
टाइम्स स्पेशल
सुकिवली येथील महाराजस्व समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.