loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनात पेडणेकर विद्यालय प्रथम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : व्ही. एम. इन्स्टिट्यूट, लांजा आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील प्राथमिक गटात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथील इ.७वीतील निनाद माने व करण पालकर यांच्या 'ग्लुकोज इंडिकेटर' प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. विद्यार्थ्यांना 2 हजार 500 रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्यांना प्रशालेच्या विज्ञान विभाग प्रमुख स्वरा वासुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईचे अध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, उपाध्यक्ष ॲड. रमेश कदम,  प्रमुख कार्यवाह मनोहर पाटोळे, स्थानिक कमिटी अध्यक्ष दिगंबर पाटोळे, उपाध्यक्ष संजय पाटोळे, कार्यवाह मनोहर पाटोळे, शाळा समिती चेअरमन कॅ.नामदेव पाटोळे, सदस्य विजय पाटोळे, मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर आदींनी अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg