ठाणे(प्रतिनिधी) - ठाणे शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास मोलाची मदत झाली आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त पंकज शिरसाट यांच्या निर्देशानुसार सहा. पोलीस आयुक्त किरण बालवडकर यांनी वाहतूक पोलिसांकरवी ग्रीन कॉरीडॉर सदृष्य तात्काळ कार्यवाही करीत विद्यार्थ्यांना अवघ्या काही मिनिटांत सात किलो मीटर अंतरावरील परीक्षा केंद्रावर पोहोचवले. शनिवारी दुपारी २:३० या वेळेत बारावी इयत्तेची भुगोल विषयाची परिक्षा होती. विद्यार्थी सुजित मिश्रा व त्याचा एक परिक्षार्थी मित्र अंबरनाथहून कल्याण येथे परीक्षा देण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यावेळी लोकल ट्रेन उपलब्ध न झाल्यामुळे ते अडचणीत सापडले.
ही माहिती हेल्पलाईन नंबरवर मिळताच उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानुसार कल्याण विभागाचे सहा. पोलीस आयुक्त किरण बालवडकर यांनी लागलीच दखल घेत, विद्यार्थ्यांना बदलापूर-उल्हासनगर रोडवरील साईबाबा मंदिर येथे बोलावले. त्याठिकाणी अंबरनाथ बीट मार्शल सलमान तडवी व उल्हासनगर बीट मार्शल विजय गायकवाड पोहोचले. दोन्ही पोलिसांनी प्रत्येकी एक विद्यार्थी आपापल्या दुचाकीवर बसवून जलदगतीने त्यांना कल्याण जोशी बाग, पारनाका येथील अचिव्हर्स पब्लिक हायस्कुल येथील परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचवले. या कामी कल्याण बीट मार्शल भीमराज दातीर यांनीही खुश्कीचा मार्ग दाखवत मदत केल्याने दोन्ही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले आहेत.
दरम्यान, दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक विभागाने विशेष सुविधा सुरू केली आहे. परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी अशा कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वाहतूक पोलिस सज्ज ठेवण्यात आले आहेत. शहरातील विविध ठिकाणी ५४ रायडर्स तैनात करण्यात आले असून 7039003866 या ट्रॅफिक कंट्रोल व्हॉट्सॲप क्रमांकासह 8286300300 व 8286400400 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच १८ वाहतूक युनिटमध्येही संपर्कासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळत असून वाहतूक पोलिसांच्या या सेवाभावी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.