loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा आज पालीतून शुभारंभ

रत्नागिरी : शेतकरी, सर्वसामान्य जनता, महिला आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा एक अंतर्गत जिल्ह्यात पहिलेच शिबीर पाली मध्ये होत असून शनिवारी सकाळी 10 वाजता याचा शुभारंभ राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरीचे तहसीलदार आणि प्रातांधिकारी कार्यालयाच्यामार्फत या शिबिराचे आयोजन पाली बसस्थानकाजवळील श्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामध्ये अद्ययावत 7/12 उताऱ्यांचे वितरण होणार आहे. जमिनींचे खरेदीविक्री हस्तांतरण प्रकरणे, विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलेअर, वय अधिवास यांचे दाखले, दिव्यांग लाभार्थी, वृध्द लाभार्थी, अंत्योदय प्राधान्य योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य लाभार्थ्यांना रेशनकार्ड वाटप आदी होणार आहे.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार राजाराम म्हात्रे व प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले आहे. पाली येथील तलाठी कार्यालयाचे भूमिपूजनही सायंकाळी 4 वा. पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg