loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न; १०६ दाखल्यांचे वितरण

साटेली-भेडशी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी करणेबाबत महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ अंतर्गत महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, शेतकरी व महिला यांचे दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व त्यांना शासनाच्या विविध योजना व सेवा पुरविणे याकरिता दोडामार्ग तालुक्यामध्ये कोनाळ मंडळामध्ये सरस्वती विदयामंदीर, कोनाळ याठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रशासनाच्यावतीने सदर शिबीराकरीता नियुक्त दोडामार्ग तालुका नोडल अधिकारी विरसिंग वसावे, तथा सह जिल्हा निबंधक १ मुद्रांक जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, तहसिलदार राहुल गुरव, नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, सहायक गटविकास अधिकारी यशवंत गवस, दुय्यम निबंधक दोडामार्ग सुनिल वराटकर, शिक्षणविस्तार अधिकारी सूर्यकांत नाईक, महसूल नायब तहसीलदार संजय मद्रे, मंडळ अधिकारी कोनाळ कांचन गवस व दोडामार्ग तालुक्यातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल कर्मचारी, इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाबाबतचे मार्गदर्शन नोडल अधिकारी व तहसीलदार दोडामार्ग यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले. शासनाच्या विविध योजना व सेवा पुरविणेच्या आयोजित शिबीरान्वये विहीत प्रकारचे एकूण १०६ दाखल्यांचे वितरण केले गेले. तसेच इतर प्रकारचे रेशनकार्ड, ७/१२, फेरफार, ८ अ, फार्मर आयडी, ७/१२ दुरुस्तीकरण या प्रकारच्या दाखले व सेवा पुरविण्यात आल्या. यामध्ये कोनाळ मंडळातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी चांगल्या प्रकारे सदर शिबीराला प्रतिसाद दिला व प्रशासनाचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg