loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत भटक्या श्वानांच्या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार; स्वखर्चाने करणार निर्बीजीकरण

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नावर प्रशासकीय कार्यवाहीची प्रतीक्षा न करता, सामाजिक कार्यकर्ते निशांत चिंतामणी तोरसकर आणि डॉ. चंद्रशेखर गवस यांनी स्वखर्चाने उपाययोजना करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सबनीसवाडा आणि परिसरातील भटक्या श्वानांचा उपद्रव कमी करण्यासाठी तोरसकर आणि डॉ. गवस यांनी पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. परिसरातील सर्व भटक्या श्वानांचे स्वखर्चाने निर्बीजीकरण करण्यात येणार आहे, ज्यामुळे त्यांची संख्या मर्यादित राहण्यास मदत होईल. या श्वानांच्या निवासासाठी आणि देखभालीसाठी एक स्वतंत्र 'शेल्टर होम' उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

टाईम्स स्पेशल

शहरात भटक्या कुत्र्यांमुळे अपघातांचे प्रमाण आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने, या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी उचललेले हे पाऊल नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. ​समाजाप्रती असलेल्या जबाबदारीतून आणि प्राणीमात्रांवरील दयेपोटी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सावंतवाडी शहरात निशांत तोरसकर यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg