loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीयांची आखाती संकटातून सुटका; दुबईहून पहिलं प्रवासी विमान मुंबईत दाखल

मुंबई: इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे आखाती भागातील हवाई वाहतूक विस्कळीत झाली होती. दुबईतील भारतीय दूतावासाच्या समन्वयाने विशेष उड्डाणाची व्यवस्था करण्यात आली. प्राधान्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या पहिल्या टप्प्यात परत आणण्यात आल्याची माहिती अधिकृत देण्यात आली आहे. जेएनएन, इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दुबईहून निघालेलं पहिलं विशेष प्रवासी विमान रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरक्षितपणे उतरलं. मागील तीन दिवसांपासून दुबईत अडकलेल्या नागरिकांनी मायदेशी परतल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे आखाती भागातील हवाई वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक उड्डाणे रद्द किंवा उशिराने होत असल्याने दुबईसह विविध शहरांमध्ये भारतीय नागरिक अडकून पडले होते. यात पर्यटक, व्यावसायिक तसेच नोकरीसाठी गेलेले कामगार यांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने हालचाली सुरू केले. दुबईतील भारतीय दूतावासाच्या समन्वयाने विशेष उड्डाणाची व्यवस्था करण्यात आली. प्राधान्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या पहिल्या टप्प्यात परत आणण्यात आल्याची माहिती अधिकृत देण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर पोहोचलेल्या प्रवाशांनी प्रशासनाचे आभार मानले. “अनिश्चिततेच्या वातावरणात आम्ही खूप तणावाखाली होतो. उड्डाण मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला,” अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली. विमानतळावर वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर प्रवाशांना घरी रवाना करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, अजूनही दुबईसह इतर आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी सरकारकडून पुढील काही दिवसांत आणखी विशेष उड्डाणे आयोजित केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आखाती संघर्षाच्या छायेत असताना मायदेशी परतलेल्या नागरिकांसाठी हे उड्डाण मोठा दिलासा ठरले असून, उर्वरित नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg