loader
Breaking News
Breaking News
Foto

पोईप येथे मिनी एमआयडीसीची मागणी

मालवण (प्रतिनिधी) - पोईप येथील ७५ एकर धरण क्षेत्रात मिनी एमआयडीसी म्हणून उद्योग प्रकल्प सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे या सर्वांच्या माध्यमातून लवकरात लवकर आपली व पोईप येथील जनतेची मागणी पूर्ण केली जाईल अशी स्पष्ट ग्वाही आम निलेश राणे यांनी शिवसेनेचे मालवण तालुका संपर्क प्रमुख पंकज वर्दम यांना दिली आहे. शिवसेनेचे मालवण तालुका संपर्क प्रमुख पंकज वर्दम यांनी अधिवेशन काळात आमदार निलेश राणे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा करीत पोईप येथील ७५ एकर धरण क्षेत्रात शासनाने कोणतेही प्रकल्प राबवून पोईप पंचक्रोशीतील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्मिती करावी अशी मागणी केली. त्यावेळी आमदार राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण कार्यकर्त्यांना व जनतेला दिलेला शब्द नेहमी पाळतो त्यामुळे मी दोन महिन्यांपूर्वी आपल्या पक्ष प्रवेशाच्या वेळी पोईप येथील जाहीर कार्यक्रमात आपण मागणी केलेल्या विकास समस्या पुर्ण करण्याचा शब्द दिला आहे. तो मी नक्कीच पूर्ण करणार असल्याचे आम. राणे यांनी सांगितल्याची माहिती श्री.वर्दम यांनी पत्रकारांना दिली. यावेळी आम राणे यांनी मी मुंबईहून आल्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पोईप धरण क्षेत्राची पाहणी, भौगोलिक परिस्थिती यांचा सर्व्हे करून कोणता प्रकल्प राबविता येईल व बेरोजगारांना रोजगार कशा उपलब्ध होईल याचा अभ्यास केला जाईल व सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितल्याची माहिती पंकज वर्दम यांनी दिली. दरम्यान, आमदार निलेश राणे यांच्याशी शिवसेना मालवण तालुका संपर्क प्रमुख पंकज वर्दम यांनी पोईप धरण बाधित जमीन व इतर विकास समस्या बाबत सकारात्मक चर्चा भ्रमणध्वनी द्वारे केल्याबद्दल पोईप येथील जनता व कार्यकर्ते समाधान व्यक्त करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

एमआयडीसी देण्याची आम.निलेश राणेंची ग्वाही

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg