दोडामार्ग (प्रतिनिधी) - जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या साटेली गावातील श्री देवी शांतादुर्गा देवी सातेरी, देव पुरमार, देव चाळोबा, देवस्थान शिमगोत्सवमधील आकर्षण असलेला घोडेमोडणी उत्सव शनिवारी सहाव्या दिवशी मोठया उत्साहात पार पडला. यावेळी परिसरातील असंख्ये भाविक उपस्थित होते. चाळोबा देवस्थान येथे बोललेले नवस फेडण्यासाठी अनेक भाविक यांनी बकरे कोंबडे, या ठिकाणी नवस फेडण्यासाठी बांधले होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जयघोषात रंगाची उधळण करत ढोलताशांच्या गजरात श्री देवी शांतादुर्गा मंदिराच्या प्रांगणात उत्सवाला सुरुवात करण्यात आली. शेवटची घोडमोडणी आवाडा चाळोबा देवस्थान येथे पार पडली. या नंतर घोडेस्वार राञी मंदिरात दाखल झाले. येथे घोडेमोडणी कार्यक्रम सांगता करण्यात आली.
श्री देवी सातेरी मंदिर येथून निघालेल्या तीन घोडेस्वार पैकी एकावर अवसार येतो त्यामुळे तो घोडा पळत पुढे जातो तो पाटेकर देवस्थान होळीच्या सीमे पलीकडे जाऊ नये यासाठी मानवी साखळी केली जाते. हा क्षण अवर्णनीय असतो, हा नजराणा बघण्यासाठी तसेच घोडया मागे धावण्यासाठी युवकांची चढाओढ लागते. अनेक युवा पिढी पारंपरिक शिमगोत्सव मधिल ही कला आजही पुढे नेत आहेत. हे बघायला मिळते. साटेली गावातील शिमगोत्सव घोडमोडणी म्हणजे वेगळं आकर्षण त्यामुळे अनेक गावांतील मंडळी गर्दी करतात. घोडेमोडणी, उत्सव याची दुपारी दोन वाजल्यापासून सुरुवात होते. ज्याना घोडेस्वार म्हणून पुढे येणारे युवक यांना पारंपरिक पोशाख परिधान करून फेटा बांधून सजवले जाते. नंतर मंदिराच्या बाहेर येऊन ग्रामदेवता श्री देवी शांतादुर्गा देवी सातेरी इतर देवतांना गाऱ्हाणे घालून, मंदिराला होळीला प्रदक्षिणा घालून घोड़मोडणी नाचण्याचा उत्सवात सुरूवात करण्यात आली.
देवतांचे तीन घोडेस्वार यांची तयारी पूर्ण झाल्यावर तीन घोडेस्वार तसेच गावातील ग्रामस्थ मानकरी मंडळी यांनी मंदिरबाहेर येऊन देवीला गाऱ्हाणे घातले. हे देवी आज वर्षाचे घोडे आज बाहेर काढले आहे. त्यांचे कार्य घोड़मोडणी नाचण्याचा उत्सव आहे. त्या त्या देवतांच्या ठिकाणी उत्सव पार पडला कि पुन्हा सुखरूप पुन्हा घेऊन ये जर काय अडीअडचणी ईले तर ते बाहेरच्या बाहेर दूर कर रे महाराजा असे सांगून घोडेमोडणी उत्सव दुपारी तीन वाजता सुरू झाला. देवी शांतादुर्गा पुरमार येथून ही घोडमोडणी उत्साहाची सुरूवात करण्यात आली.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.