loader
Breaking News
Breaking News
Foto

शुरवीर शिवा काशिद यांचे १३ वे वंशज आनंदराव काशिद यांचा खेड येथे सन्मान

खेड - छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शुरवीर शिवा काशिद यांचे १३ वे वंशज श्री आनंदराव रघुनाथराव काशिद खेड येथे आले असता, त्यांच्या स्वागत व सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. खेड तालुका नाभिक समाज संघटना व श्री संत सेना महाराज पतसंस्था यांच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान पतसंस्थेचे चेअरमन महादेवराव चव्हाण व संघटनेचे अध्यक्ष अमर दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष संतोष शिंदे, सचिन चव्हाण, व्हाईस चेअरमन सीताराम राऊत, नागेश दळवी, महादेव चव्हाण, संदीप तांबे तसेच पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी आनंदराव काशीद यांनी खेड तालुका नाभिक समाज संघटना व श्री संत सेना महाराज पतसंस्था यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg