केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - तालुक्यातील असोडे गांगरकरगाव येथे स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर गावात प्रथमच रस्ता व एस. टी. बसची सोय झाल्याने स्थानिक ग्रामस्थ यांनी जल्लोष साजरा करीत एस. टी. बसचे सोमवार दि. ०२ मार्च रोजी फटाक्यांची आतिषबाजी करीत जोरदार स्वागत केले व आमदार किरण सामंत यांना धन्यवाद दिले आहे. यामुळे असोडे पंचक्रोशीतून ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७८ वर्षे उलटूनही असोडे गांगरकर गावात व्यवस्थित रस्ता व राज्य परिवहन (ST) सेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन दळणवळण, शिक्षण, आरोग्य सेवा व शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या सगळ्या सुविधेसाठी त्यांना दररोज चार ते पाच किलोमीटरचे अंतर पायी चालत जावे लागत होते. याबाबत स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, तत्कालीन लोकप्रतिनिधी व शासन स्तरावर प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आमदार किरण उर्फ भय्या सामंत यांनी आमदारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या प्रश्नाची दखल घेत अवघ्या एका वर्षात रस्त्याचे काम पूर्ण केले. तसेच गावात एस. टी. सेवा सुरू करण्यास पुढाकार घेतला. या कामासाठी मठ गांगरकर गावचे गावकर दीपक गांगरकर, ग्रामस्थ राजेश भाटवडेकर तसेच शिवसेनेचे गवाणे उपविभागप्रमुख गुरुप्रसाद पवार यांच्यासह प्रमुख ग्रामस्थ यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
त्यांच्या प्रयत्नांमुळे व आमदार सामंत यांच्या तत्पर निर्णयामुळे अखेर गावाचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून असोडे गांगरकर गावाच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. रस्ता व एस. टी. सेवा सुरू झाल्यामुळे गावाच्या प्रगतीला नवी गती मिळेल, असे गुरुप्रसाद पवार यांनी सांगितले असून यापुढे देखील गावाच्या विकासासाठी आमदार किरण सामंत यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळेल, असा विश्वास देखील व्यक्त केला.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)




























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.