पनवेल :- राज्यात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार राज्यातील पाणंद (शेत) रस्ते अतिक्रमणमुक्त करून त्यांची नोंद सात-बारा उताऱ्यावर करण्याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गाव नकाशावर दिसणाऱ्या शेत किंवा पाणंद रस्त्यांची नोंद सात-बारा उताऱ्यावरील ‘इतर हक्क’ या सदरात करण्यात येणार असून यासाठी ई-फेरफार प्रणालीमध्ये तांत्रिक बदल केले जात असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्यात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहिम सुरू केली असून त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने पाणंद रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्यांची नोंद सात-बारा उताऱ्यावर करण्यात येणार असल्याचे जानेवारी, २०२६ मध्ये निदर्शनास आले आहे. या मोहिमेचा भाग म्हणून सात-बारा उताऱ्यावर पाणंद रस्त्यांची नोंद घेण्यास सुरूवात केली काय व किती महिन्यांत सदर मोहिम पूर्ण करण्यात येणार आहे, त्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी दाखल केला होता. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहिम सुरू केली असून त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने पाणंद रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्यांची नोंद सात-बारा उताऱ्यावर करण्यात येणार आहे.
दिनांक २२ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १४३ आणि मामलेदार कोर्ट अॅक्ट, १९०६ च्या कलम ५ नुसार आदेश पारित करताना शेत रस्ता जात असलेल्या शेताचा गट नं./ सर्वे नं. शेतरस्त्याची रुंदी, लांबी, दिशा व सीमा इत्यादी बाबत ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्याबाबत सक्षम अधिकारी / प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत. यानुसार क्षेत्रीयस्तरावर ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्क या सदरात नोंद घेण्यात येत आहेत. गाव नकाशावरील शेत/पाणंद रस्त्याची नोंद ७/१२ उता-यावर इतर हक्क या सदरी नोंद घेण्यासाठी ई-फेरफार प्रणालीमध्ये नव्याने विकसन करण्याबाबत जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे यांचेकडून राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर विकसनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संबधित नोंदी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात येतील.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)




























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.