loader
Breaking News
Breaking News
Foto

चौके हायस्कुलच्या पाच विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती

मालवण (प्रतिनिधी) - ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी संस्थेतर्फे चौके येथील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना 'ज्ञानज्योती शिष्यवृत्ती' देण्यात आली. त्यांच्या खात्यावर ही रक्कम प्रदान करण्यात आली. ग्लोबल फाऊंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी ग्रामीण भागातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती अंतर्गत रक्कम प्रदान करण्यात येते. विद्यालयातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा शैक्षणिक प्रगतीमध्ये फायदा झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावर्षी विद्यालयातील कुशल विशाल गावडे, पल्लवी प्रमोद सावंत, भाग्यश्री सखाराम चव्हाण, नम्रता चव्हाण, चरण दशरथ जाधव या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. संस्था स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापिका रसिका गोसावी त्याचप्रमाणे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ग्लोबल फाउंडेशन या संस्थेचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg