loader
Breaking News
Breaking News
Foto

आंतरराष्ट्रीय परिषदेत मालवणच्या युगंधा खोबरेकर हिचे सुयश

मालवण (प्रतिनिधी) - मुंबई जुहू येथील एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या विद्यार्थ्यांनी NIFTEM (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट), कुंडली (सोनीपत) येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन अ‍ॅडव्हान्स्ड नेक्स्ट जनरेशन व्हिजन फॉर इमर्जिंग अँड सस्टेनेबल हेल्दी फूड्स (ANVESH 2026) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या परिषदेत मालवणची सुकन्या युगंधा लक्ष्मीकांत खोबरेकर हिने पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही आंतरराष्ट्रीय परिषद MOFPI (मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया) अंतर्गत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये २५ पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते. युगंधा खोबरेकर हिने “Development of Green Chutney Mix Enriched with Moringa Oleifera Leaves Powder” या विषयावर प्रेझेंटिंग ऑथर म्हणून प्रभावी सादरीकरण केले. हे संशोधन डॉ. सुलक्षणा माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून या सादरीकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक करण्यात आले. तसेच ध्वनी मलकान हिने ओरल प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

टाईम्स स्पेशल

या सादरीकरणात युगंधा खोबरेकर हिने वृश्टी जोबालीया, अरोमा कोळी आणि इफ्रा मन्सुरी यांच्यासह को-ऑथर म्हणून सहभाग नोंदवला. हे सादरीकरण प्रोफेसर झैनाब पाथारिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या परिषदेत Food Nutrition and Dietetics विभागातील २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट्स निवडले गेले. या यशामध्ये मिस. प्रणाली दराडे आणि डॉ. राजेश्री शिंदे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. युगंधा खोबरेकर ही मालवण मधील बांधकाम व्यावसायिक लक्ष्मीकांत खोबरेकर व मृण्मयी खोबरेकर यांची कन्या असून जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, मालवण (MES)ची माजी विद्यार्थिनी आहे. या यशाबद्दल युगंधा हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg