loader
Breaking News
Breaking News
Foto

जगभरात कच्च्या तेलाच्या दरात वाढ

मिडल-ईस्टमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या कच्च्या तेलाच्या बाजाराला उकळी आल्याचं दिसत आहे. याशिवाय त्याचा थेट परिणाम तुमच्या-आमच्या खिशाला आणि जागतिक अर्थव्यवस्थेवरही होत आहे. मध्यपूर्वेतील युद्धाची धग कच्च्या तेलावर जाणवू लागली आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात पुन्हा एकदा अशांतता निर्माण झाली असून युद्धाचा धोका आणि बिकट परिस्थिती दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एप्रिल 2024 नंतर प्रथमच ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत 90 डॉलर प्रति बॅरलवर उसळली आहे. पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी गंभीर समस्यांना तोंड देत आहे. अशा परिस्थितीत, तणाव लवकरच शांत झाला नाही तर कच्च्या तेलाची किंमत प्रथम 100 डॉलर आणि नंतर 150 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचेल, असा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. असे झाल्यास भारतासारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांसाठी काचेच्या तेलातील दरवाढ धोकादायक ठरेल. कच्च्या तेलाच्या किमती वाढत राहिल्या तर पेट्रोल आणि डिझेल देखील महाग होऊ शकतात.

टाईम्स स्पेशल

गेल्या आठवड्यात ब्रेंट ऑइल फ्युचर्सची किंमत 25% पेक्षा जास्त वाढली असून भारत जगभरातून गरजेच्या अंदाजे 85% कच्च्या तेलाची आयात करतो, ज्यापैकी मध्यपूर्व दरवर्षी अंदाजे 40%-45% कडून खरेदी होते. अशा स्थितीत, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती भारताच्या तेल आयात बिलावर दबाव पडू शकतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg