loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे सावट, शिवसेनेच्या घरात दुखः असल्याचे कारण देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी धुळवड साजरी केली नाही

ठाणे (प्रतिनिधी) - यावर्षीची होळी आणि धुलीवंदन यावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे सावट, दुखाची किनार आणि तसेच शिंदे यांचे खाजगी स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने त्याचे नाव घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या शिवसेनेच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या घरात देखील दुखद निधन झाले म्हणून हे दुख कार्यकर्त्यांच्या घरातील म्हणजे आमच्या परिवारातले आहे. त्यामुळे धुळवड साजरी करत नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाक्यावर पत्रकारांशी संवाद साधत धुळवड साजरी न करण्यामागेचे कारण स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यातील जनतेच्या जीवनात सप्तरंगाची उधळण होवो आणि आनंदाची बरसात होवो, नागरिकांची इडीपिडा टळो, राज्यावरची आणि देशावरची सर्व संकटे जळून खाक होवोत, अशा प्रकारची प्रार्थना होलिका देवीजवळ काल केली. धुलीवंदननिमित्त जनतेला मनापासून धुलीवंदनाच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यात सुखाचे, समृद्धी, आनंदाचे आणि आरोग्याचे दिवस येवोत. अशा शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी टेंभीनाक्यावरील आनंदाश्रमात येऊन शिवसेना दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावतात आणि त्यानंतर पक्षातील सहकाऱ्यांसोबत धुळवड साजरी करतात. परंतु यंदा त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावले खरे पण, सहकाऱ्यांसोबत त्यांनी धुळवड साजरी केली नाही.

टाईम्स स्पेशल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथी प्रमाणे जयंतीनिमित्त भिवंडीत वाहतुक बदल आम्ही धुलीवंदन दरवर्षी उत्साहात साजरी करतो. यंदा उत्साहात, जल्लोष करण्याऐवजी परंपरा जोपण्याचे काम शिवसेना करीत आहे. परंपरेनुसार, आनंदाश्रमात आनंद दिघे आणि बाळासाहेबांना वंदन केले, त्यांनाही विविध रंग लावून परंपरा जोपसली. येथे हजारो कार्यकर्ते येतात आणि प्रत्येक सण साजरा करतात. आनंद दिघेंनी ठाण्यात सर्व सण, गणपत्ती, नवरात्रो, दहिहंडी, होळी, धुलीवंदन हे सर्व सण सुरू केले. ठाण्याची परंपरा राज्यात पसरविण्याचे काम केले. ठाणे ही उत्सवाची आणि गोविंदा आणि सर्व सणांची पंढरी म्हणून ओळखतो. पर्यावरण पुरक होळी साजरी करावी, याचे आवाहन आधीच केले. अशी होळी साजरी करून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. राज्य शासनाकडून करण्यात येणाऱ्या आवाहनाला जनता प्रतिसाद देत आहे. केमिकल मिश्रीत रंगांचा वापर कमी झालाय, नैसर्गिक रंगांचा वापर जास्त करत आहेत, असे शिंदे म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg