loader
Breaking News
Breaking News
Foto

हिंदी राष्ट्रभाषा प्रवेशिका परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे घवघवीत यश

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा आयोजित हिंदी विषयाची प्रवेशिका परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेबद्दल आवड निर्माण व्हावी व भाषेचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत शाळेतील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. इयत्ता ५ वी मधील उगम सूर्यकांत वेर्लेकर याने विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली. तर, प्रजय जगन्नाथ सावंत, योगांक विनोद कारिवडेकर, गायत्री रघुनाथ तानावडे, गिरिजा सागर चव्हाण, वरद संततुकाराम राणे, लावण्या योगेश तावडे, जान्हवी दत्तात्रय सावंत यांनी प्रथम श्रेणी पटकावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इयत्ता ६ वी मधील निधी बाळकृष्ण शिर्के, कॅलव्हर्ट अलेक्स फर्नांडिस, ऋतुजा गणेशप्रसाद पेडणेकर, मन्वा प्रसाद साळगावकर, देवांग महेश सारंग, मोहम्मद माझ पटेल, शिवराज प्रसाद राऊळ, चैत्राली कुमलेश पाटील, भुवन पुंडलिक दळवी, अद्वैत संतोष पाथरवट या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकावली. तसेच रेहान जासिम सारंग व सान्वी धनश्याम पावसकर यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. सरस सतीश नाईक व पृथ्वीराज यशोधन गवस यांनी तृतीय श्रेणी पटकावली. इयत्ता ७ वी मधील साईना श्रीराम अळवणी हिने प्रथम श्रेणी पटकावली. शौर्य जयवंत चव्हाण, अस्मि अमेय प्रभू तेंडोलकर, विहान जयवंत राणे, स्पृहा अमेय आरोंदेकर यांनी द्वितीय श्रेणी तर, हिना जासिम सारंग, आराध्या मंदार कुडव, विजय विनोद सावंत, पूर्वी संजय आरोलकर, हेरंब शामसुंदर नाटेकर यांनी तृतीय श्रेणी प्राप्त केली.

टाईम्स स्पेशल

परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या हिंदी विषयाच्या शिक्षिका कनिका राजपुरोहित यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे संचालक रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी वरील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg