loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुरत्न समृद्ध योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ; आमदार केसरकरांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार

सावंतवाडी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली ’सिंधुरत्न समृद्ध योजना’ आता पुढील तीन वर्षे सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेच्या दुसर्‍या टप्प्याची (२.०) घोषणा करून मुदतवाढ दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या योजनेची मूळ तीन वर्षांची मुदत मार्च २०२५ मध्ये संपली होती. कोकणच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी या योजनेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. सरकारने ही मागणी मान्य करत ’सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ जाहीर केल्याने कोकणातील विकासकामांना मोठी चालना मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, त्यांना पुष्पगुच्छ देत कोकणवासीयांच्या वतीने आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg