मालवण (प्रतिनिधी) - सीमाशुल्क प्रतिबंधक पथक सिंधुदुर्ग विभागाच्या पथकाने देवगड किनाऱ्यालगत अनधिकृत मासेमारी करताना पकडलेल्या तीन एलईडी मासेमारी नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई करत तिन्ही नौकांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड करून नौकांवरील एलईडी यंत्रणेचे साहित्य जप्त केली आहे. मात्र या कारवाईवर महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी आक्षेप घेत पकडलेल्या नौकांची नोंदणी प्रमाणपत्रे व नौका मालक कोण हे समजले नसताना मत्स्य विभागाने नेमकी कारवाई कोणावर केली आहे? सदर दंड कोणाकडून वसुल केला जाणार? नौका मालकांची नावे मत्स्य विभाग जाहीर का करत नाही ? कोणाच्या दबावामुळे मत्स्य विभाग नावे जाहीर करत नाही? असे अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
सीमाशुल्क प्रतिबंधक पथक सिंधुदुर्ग विभागाच्या पथकाने देवगड किनाऱ्यालगत अनधिकृत मासेमारी करताना तीन एलईडी मासेमारी नौका पकडल्या होत्या. त्यावेळी केलेल्या तपासणीत नौकाधारकांकडून नौकेची नोंदणी प्रमाणपत्रे, मासेमारी परवाना, खलाशी जाहीरनामा अथवा अन्य आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. या तिन्ही नौका कारवाईसाठी मत्स्य व्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या. मत्स्य विभागाने या नौकांवर कारवाई करताना तिन्ही नौकांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावत नौकांवरील एलईडी यंत्रणेचे साहित्य जप्त केले. मात्र ही कारवाई नेमकी कोणावर केली असा प्रश्न महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी उपस्थित केला आहे. या नौकांची नोंदणी प्रमाणपत्रे मिळाली नसताना तसेच मालक कोण हे समोर आले नसताना मत्स्य विभागाने नेमका दंड कोणाला ठोठावला आहे ? नौकेला दंड म्हणजे नौका दंड भरणार का ? असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.
यापूर्वीच्या कारवायांमध्ये मत्स्य विभागाकडून नौका मालकांची नावे जाहीर करण्यात आली. असे असताना या तीन नौकांच्या मालकांची नावे मत्स्य विभागाने जाहीर का केली नाहीत? या नौका कोणाच्या आहेत हे आम्हा सर्व मच्छिमारांना व जनतेला कळले पाहिजे. ठोठावलेला दंड कोणाकडून वसुल होणार व वसुल झाल्यास तो कोणाकडे वर्ग होणार याची माहिती मिळाली पाहिजे. नौका मालकांची नावे मत्स्य विभाग स्वतःच्या स्वार्थासाठी लपवत आहे का की राजकीय किंवा इतर दबावापोटी लपवत आहे, असे टिकात्मक प्रश्नही मिथुन मालंडकर यांनी उपस्थित करत मत्स्य विभागाच्या कारभारावर बोट ठेवले आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.