loader
Breaking News
Breaking News
Foto

‘विज्ञानामृतम २०२५-२६’ भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात

खेड (प्रतिनिधी) - अगस्त इंटरनॅशनल फाउंडेशन आणि रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोसायटी जनरल सेक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या आर्थिक सहकार्याने खेड येथील एम आय हजवानी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खेड येथे ‘विज्ञानामृतम २०२५२६’ मेगा सायन्स फेअरचे भव्य आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी आवड व जिज्ञासा निर्माण व्हावी तसेच विज्ञानातील विविध संकल्पनांचा वापर करून विद्यार्थ्यांनी स्वतः मॉडेल तयार करून सादर करावीत या उद्देशाने या भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सबा मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मंचावर नगरसेविका सौ.वैभवी खेडेकर, पोलीस निरीक्षक श्री. घाडगे, डॉ. अनिता आवटी, रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम, खेड तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्रीमती बेलोसे, अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनचे राज्य प्रमुख पराग सावंत, तसेच वर्सटाईल एड्युकोचे संस्थापक अजय दरेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. खेड, चिपळूण, गुहागर तसेच रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील शाळांमधून ८५ पेक्षा अधिक विज्ञान मॉडेल्स सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांचे आत्मविश्वासपूर्वक सादरीकरण करत विज्ञानातील संकल्पना प्रभावीपणे मांडल्या. याचबरोबर कौन बनेगा विज्ञानपती? या उपक्रमालाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरातील विविध शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनास भेट देत प्रयोगशील विज्ञानाची अनुभूती घेतली.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, मेडल, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील विजेते-प्राथमिक गट : प्रथम : ज्ञानदीप विद्यालय, खेड स्मार्ट इरिगेशन सिस्टम (दक्ष शिंदे, अनुज शेलार), द्वितीय : जि. प. शाळा कर्टेल सेंद्रिय शेती (पूर्वा कदम), तृतीय : सहजीवन हायस्कूल, खेड ऍडव्हान्स स्कूटर (प्रणव बेलोसे, वेदांत कोळी), उत्तेजनार्थ प्रथम : कविता विनोद सराफ हायस्कूल, लोटे शेणापासून वस्तू (मीरा साळुंखे), उत्तेजनार्थ द्वितीय : अभिनव ज्ञान मंदिर, माणगाव गार्बेज क्लिनर (संदीप दिवेकर), माध्यमिक गट :प्रथम : सुमन हायस्कूल, टेरव वृद्धांचा सोबती (विभावरी वास्कर, हरीश गावडे),द्वितीय : रोटरी इंग्लिश स्कूल, खेड इझी पेसी (स्पंदन धामणे), तृतीय : मेजर ग. ह. पवार हायस्कूल, बोरघर कृषी पूरक यंत्र (संस्कृती येसरे), उत्तेजनार्थ प्रथम : परांजपे मोतीवाले हायस्कूल, चिपळूण स्मार्ट वॉकर (वैदेही जाधव), उत्तेजनार्थ द्वितीय : कविता विनोद सराफ हायस्कूल, लोटे मॅथ्स पार्क (खुशबू अन्सारी). या भव्य विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोगशीलतेची संधी मिळाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळाली. सर्व विजेत्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg