loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत पुन्हा एकदा ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी : परदेशातील मैत्री, आर्थिक मदतीचे आश्वासन आणि परताव्याच्या आमिषाने रत्नागिरीतील एका व्यक्तीची तब्बल २२ लाख २१ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात युनायटेड किंगडममधील टिआगो फौरा तसेच स्वतःला दिल्लीतील पासपोर्ट-इमिग्रेशन अधिकारी म्हणून भासवणाऱ्या प्रिया शर्मा हिच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्यमनगर परिसरातील पडवेकर कॉलनी येथे राहणारे सलील अब्दुल कादीर काझी यांची एका ऑनलाईन संकेतस्थळाच्या माध्यमातून टिआगो फौरा याच्याशी ओळख झाली. २२ जुलै २०२५ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपीने विश्वास संपादन करत आर्थिक व्यवहारांची मालिका सुरू केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, स्वतःकडे ६० हजार यूके पाउंड आणि सोने असल्याने दिल्ली इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतल्याचा बनाव करण्यात आला. ही रक्कम भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी तसेच कथित अडचणीतून सुटका करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ‘प्रिया शर्मा’ नावाच्या महिलेने दिल्ली येथील पासपोर्ट-इमिग्रेशन कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवत फिर्यादीशी संपर्क साधला. रक्कम लवकरच परत करण्याचे आश्वासन दिल्याने फिर्यादी काझी यांनी आपल्या आयसीआयसीआय आणि एचएसबीसी बँक खात्यांतून वेळोवेळी विविध व्यवहारांद्वारे एकूण २२ लाख २१ हजार ४०० रुपये पाठवले. मात्र, ठरल्याप्रमाणे रक्कम परत न आल्याने आणि आरोपींकडून संपर्कही तुटल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परदेशातून कार्यरत सायबर फसवणूक रॅकेटचा धागा उलगडण्याच्या दृष्टीने तपास यंत्रणा प्रयत्नशील असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना तसेच कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी आवश्यक पडताळणी करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg