loader
Breaking News
Breaking News
Foto

पालशेत येथे भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ४ ते ५ मार्च रोजी

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत संस्थेच्या २५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा रौप्य महोत्सव अत्यंत अभिमानाचा व भावनिक क्षण आहे. समाजहितासाठी समर्पित सेवाभाव, विश्वास आणि एकजुटीच्या बळावर हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण झाला. दि.२६ फेब्रु. २०२६ रोजी संस्थेला २५ वर्षे पूर्ण होत असून, रौप्य महोत्सवी वर्षाचा समारोप सोहळा दि. ४, ५ व ६ मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. सदर स्पर्धा दर्यावर्दी प्रतिष्ठान क्रीडानगरी पालशेत ता.गुहागर,जि. रत्नागिरी येथे संपन्न होणार आहेत. बुधवार दि. ४ मार्च २०२६, दु. ४.०० वा. पोमेंडी फाटा ते दर्यावर्दी प्रतिष्ठान क्रीडा नगरी पर्यंत भव्य क्रीडा ज्योत रॅली, सायं. ६.०० वा. कबड्डी स्पर्धा उद्धाटन समारंभ, गुरुवार दि. ५ मार्च २०२६ कबड्डी स्पर्धा समारोप व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ रोजी स. ९.०० वा.- श्री सत्यनारायण महापूजा, स.११.००वा. महाआरती, दु.१२.०० वा.महाप्रसाद, दु.३.३० वा. हळदी कुंकू समारंभ, सायं. ७.००वा.भजन दर्यावर्दी प्रतिष्ठान, पालशेत, रात्री ८.०० वा.महाआरती, १०.१५ वा. माऊली महिला नमन मंडळ, रत्नागिरी यांचे चौरंगी नमन. तरी नागरिकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg