ठाणे (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत नागरिकांसाठी विशेष शिबिराचे शनिवारी येऊर येथे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा उद्देश महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणे हा होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी उर्मिला गलांडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील, तहसीलदार उमेश पाटील, नगर भूमापन अधिकारी सिद्धेश्वर घुले, उपाधीक्षक भूमी अभिलेख सचिन वाघ तसेच नायब तहसीलदार पैठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र प्रगती करत असून महसूल आणि भूमी अभिलेख विभाग लोकाभिमुख होत असून नागरिकांना कार्यालयात हेलपाटे न घालता सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होत आहे. नागरिकांना महसूल व भूमी अभिलेख विभागामार्फत उपलब्ध असलेल्या विविध सेवा व योजनांची माहिती देण्यात आली. विशेषतः जमीन मोजणी, नकाशे, फेरफार प्रकरणे, सातबारा उतारे, तसेच महाभूमी पोर्टलवरील ऑनलाइन सुविधा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनेक नागरिकांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांबाबत अर्ज सादर करून तात्काळ मार्गदर्शन घेतले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशासनाच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन शासन नागरिकांना पारदर्शक व जलद सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आपल्या समस्या मांडून त्यावर तत्काळ मार्गदर्शन घेतले. अशा शिबिरांमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होत असून शासन सेवा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.