loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ साटम महाराज यांचा ८९ वा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुक्यातील दाणोली नगरीत श्री समर्थ साटम महाराज यांचा ८९ वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. आंबोली घाटाच्या पायथ्याशी वसलेले दाणोली हे तीर्थक्षेत्र आज केवळ भक्तांसाठी नव्हे तर बाहेरील हजारो पर्यटकांसाठी विसाव्याचे ठिकाण बनले आहे. तुकाराम बीज दिवशी समर्थ साटम महाराजांचा वार्षिक पुण्यतिथी सोहळा असल्याने मंदिर परिसरात सुबक पताका आरास, सभा मंडपात लावलेल्या पताका सर्वांचे आकर्षण ठरत आहे. त्यात मंदिर परिसरात खिल्लारे बैलांच्या गाडीत महाराज बसलेले आहेत, देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पुण्यतिथी उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून लांबच लांब रांगा लावल्या आहेत. सोहळ्यासाठी जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर, बेळगाव परिसरातून भाविक आले होते. मंदिरात सुगम संगीत, भजन, किर्तन आणि दुपारी महाआरती होणार असल्याने मंदिर परिसर भाविकांनी गर्दी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg