सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी जिमखाना मैदान येथील टेनिस कोर्ट रुंदीकरणाच्या नावाखाली नगरपालिकेने वर्षानुवर्षांची जुनी झाडे निर्दयपणे तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या वृक्षतोडीमुळे क्रीडाप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सावंतवाडी जिमखाना येथे सध्या नगरपालिकेच्या वतीने लॉन टेनिस कोर्टच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करताना कोर्टला लागून असलेली आणि खेळाडू, प्रेक्षकांना सावली देणारी सावलीची जुनी झाडे प्रशासनाने कोणतीही ठोस गरज नसताना तोडून टाकली. केवळ काही मुठभर धनधांडग्या व्यक्तींच्या सोयीसाठी निसर्गाचा बळी दिला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकारावर बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर म्हणाले की, "एकीकडे नगरपालिका प्रशासन 'माझी वसुंधरा' अभियान राबवण्याचे ढोंग करते आणि दुसरीकडे वर्षानुवर्षे सावली देणारी झाडे तोडून शहराचा परिसर भकास करत आहे. ही झाडे वाचवूनही टेनिस कोर्टचे आधुनिकीकरण करता आले असते, मात्र प्रशासनाने बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे." नव्याने सत्तेत आलेल्या कारभाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास करू नये, अशा संतप्त प्रतिक्रिया मैदानात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी व खेळाडूंनी व्यक्त केल्या आहेत. एक झाड मोठे व्हायला अनेक वर्षे लागतात, पण प्रशासनाने क्षणात ही झाडे तोडून पर्यावरणाचे नुकसान केले आहे. यावेळी अमेय तेंडोलकर, राजू भालेकर, महेश डोंगरे, पिंट्या गावडे, सतीश आकेरकर, गौरव केसरकर, नितीन सावंत, अमित सावंत, अतुल केसरकर, दिपक केसरकर, अमरेश आसोलकर, रोहन लाखे, विजय लाखे, रोहन पाटील, अमित लाखे यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
सुकिवली येथील महाराजस्व समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.