loader
Breaking News
Breaking News
Foto

नगरसेविका वैभवी खेडेकर यांच्या हस्ते १०वी, १२ वी परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

खेड - नुकत्याच झालेल्या १० वी व १२ वी च्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्या कोकणातील सर्वच मुलांनी उत्तुंग यश संपादन करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे. याच यशाला प्रोत्साहन देण्यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी प्रभाग क्रमांक ६ अ च्या नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहा मधील १० वी व १२ वी बोर्ड परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी खेड यांच्या वतीने करण्यात आला. उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी , १०- वी आर्या बेंद्रे - ९७.४०% , शौर्य वैभव जंगम - ७२.८०% , स्वरा स्वरूप माजलेकर - ६८% , आकांशा वर्मा - ६४% . १२ वी - ईशा पवार -९०.८०% , ध्रुव पाटील - ७५% , सलोनी वर्मा - ५४% , युक्ता पराग मिर्लेकर- ८५.६७%. सदर विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सदर प्रसंगी उपस्थित खेड नगर परिषद नगराध्यक्ष सौ. उर्मिलाताई शेट्येपाटणे , बाळू वर्मा , सर्वेश पवार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg