loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत सोलारिस हॉस्पिटलचे मोफत वैद्यकीय शिबिर संपन्न

​रत्नागिरी:डोकेदुखी, चक्कर येणे किंवा दृष्टी कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ते मेंदूतील गाठीसारख्या (ब्रेन ट्यूमर) गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. या पार्श्वभूमीवर, ठाणे येथील प्रसिद्ध सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, रत्नागिरी नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील आर. बी. शिर्के हायस्कूलमध्ये मोफत न्यूरॉलॉजी व मणक्यांच्या आजारांच्या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. आधुनिक 'न्यूरो नेव्हिगेशन' तंत्रज्ञानाचा वापर करून १०० हून अधिक ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या सोलारिस हॉस्पिटलने या शिबिराच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना मोफत उपचारांची मोठी संधी उपलब्ध करून दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या महत्त्वपूर्ण वैद्यकीय शिबिराचा शुभारंभ रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक सौरभ मलुष्टे, स्मितल पावसकर, श्रद्धा हळदणकर, रुक्सार खान, मेधा कुलकर्णी, पूजा पवार, फौजिया मुजावर, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्षा स्वप्ना करे आणि शिर्के हायस्कूलचे मनोज पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी नगर परिषद, अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिराचा फायदा केवळ रत्नागिरी शहरापुरता मर्यादित न राहता चिपळूण, संगमेश्वर, दापोली, मंडणगड आणि खेड यांसारख्या विविध भागांतील सुमारे ७७ नागरिकांनी घेतला.

टाइम्स स्पेशल

शिबिरात हॉस्पिटलचे संचालक व प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. अमित ऐवळे आणि प्रख्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. दीपक ऐवळे यांनी रुग्णांना मोफत मार्गदर्शन व उपचार सल्ला दिला. डॉ. अमित ऐवळे यांनी सांगितले की, न्यूरो-नेव्हिगेशन हे मेंदूसाठी 'जीपीएस' सारखे काम करते, ज्यामुळे कवटी न उघडता नाकावाटे अत्यंत अचूक आणि सुरक्षित शस्त्रक्रिया करता येते. तसेच मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अवघ्या ६ तासांत हालचाल करू शकतो. भारतात दरवर्षी पिट्यूटरी ॲडेनोमाचे १० लाखांहून अधिक रुग्ण आढळत असल्याने, हार्मोनल बदल किंवा मानदुखी, सायटिका, फिट्स आणि पॅरालिसिस यांसारख्या आजारांवर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे किती गरजेचे आहे, यावर डॉ. दीपक ऐवळे यांनी प्रकाश टाकला. सोलारिस हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन, ईएनटी आणि एंडोक्रायनॉलॉजिस्ट एकाच छताखाली उपलब्ध असल्याने या गुंतागुंतीच्या उपचारांमध्ये रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. या यशस्वी शिबिरासाठी पुष्कला एस., विवेक महाकाळ आणि पुरुषोत्तम पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

७७ रुग्णांना मिळाले तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg