दापोली (शशिकांत राऊत) - बाळा जो जो रे, कुलभूषणा | दशरथ नंदना ॥ निद्रा करि बाळा मनमोहना | रामा लक्ष्मणा | पाळणा लांबविला, अयोध्येसी | दशरथाचे वंशी ॥ पुत्र जन्म ला ऋषीकेशी | कौसल्येचे कुशी ॥ बाळा जो जो रे... अशाप्रकारे क्रांती दुबळे, सिध्दी दुबळे, रिया खळे, अस्मिता मांजरेकर आणि विभा भुवड या सुहासीनींनी आपल्या सुहास्य वदनाने गायलेल्या पाळणा गिताने श्रीराम जन्मोत्सव सोहळयावेळचे पूर्ण वातावरणच भारावून गेले होते. हे सर्व घडून आले गिम्हवणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंदिरात. त्यावेळी श्रीराम मंदिर आणि मंदिर सभोवतालील परिसरात उपस्थित असलेला श्रीरामप्रभूचा भक्तगण श्रीराम भक्ती रसात पूर्णपणे बुडाल्याचे दिसून आले. दापोली तालूक्यातील गिम्हवणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंदिरात सन १९४८ पासून कोरोना संक्रमणाचा काळ वगळता अखंडपणे श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याची अखंडित परंपरा वर्षानुवर्षे आजही त्याच भक्तीभावाने येथील ग्रामस्थांनी सुरूच ठेवली आहे.
गिम्हवणे दुबळेवाडीत रविवारी ६ एप्रिल रोजी या मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सवाचे किर्तन सुप्रसिध्द किर्तनकार कर्वे बुवा यांनी आपल्या सृश्राव्य वाणीतून सादर केले जन्म सोहळयाचे किर्तन पार पडताच फटाक्याची आतषबाजी केली गेली. ढोल तासे सनई चौघडे वाजविण्यात आले. श्रीराम जन्मोत्सव सोहळयाला गिम्हवणे या गावासह तालुक्यातील अबाल वृध्द स्त्री पुरूष भक्त गणांची मंदिरात झालेली प्रचंड गर्दीची उपस्थिती प्रभू रामचंद्राच्या भक्तीची साक्षच देत होती. अतिशय शिस्तबध्द आणि नेटके नियोजन करण्याची येथील गिम्हवणे दुबळेवाडी ग्रामस्थांची परंपरा ही जूनीच असून या उत्साही पंरपरेने सर्वच उपस्थितांचा उत्साह व्दिगुणीत झाला त्यामुळे उपस्थित प्रत्येकाच्याच उत्साहाला आनंदाचे भरते आल्याचे दिसले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.