loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री काळभैरवनाथ जत्रोत्सवाला अलोट गर्दी

पोलादपूर- पोलादपूर शहराचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री देव काळभैरवनाथ जोगेश्वरी रवळनाथांचा जत्रोत्सव भैरवनाथ नगर येथील सहाणेवर असंख्य भाविकांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी प्रथम सहाणेवर येऊन श्री काळभैरवनाथ महाराजांना नतमस्तक होऊन सहकुटुंब व मित्रपरिवार सहित जत्रोत्सवाच्या ठिकाणी असणार्‍या विविध दुकानांतून फिरत वेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. आकाश पाळण्यासह वेगवेगळ्या फिरत्या चक्रांवर बसण्याचे मजा रात्रभर लुटली. तसेच यावेळी मुख्य आकर्षण ठरले ते काटेतळी येथील ग्रामस्थांनी केलेल्या विविध कार्यक्रमांचे. जत्रोत्सवासाच्या दिवशी रात्री 12 वाजल्यापासून पोलादपूर तालुक्यातील काटेतळी, सडवली, चांभारगणी, मोरगिरी, फौजदारवाडी, चरई, वाकण, मोरगिरी गावठान या गावांतील काठ्या पालख्या श्री काळभैरवनाथांच्या भेटीसाठी सहाणेवर आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भैरवनाथ नगर पिंपळपार येथे काट्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले. काठ्या पालख्यांसमवेत असलेले खालुबाजापथक यांनी आपापल्या कलागुणांची कसरत करत जोरदार खालुबाजाचा ठेका धरला. यावेळी आलेल्या काठ्या पालख्या सहाणेवर विराजमान झाल्यानंतर सर्व गावच्या पालख्यांचे एकत्रित असण्यामुळे त्याठिकाणच वातावरण भक्तिमय पाहायला मिळाले. त्यानंतर पाहटे 5 वाजता यात्रोत्सवाची सांगता झाली व जमलेल्या सर्व काठ्या पालख्या श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या टेकडीला प्रदक्षिणा मारण्यासाठी रवाना झाल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg