loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवलीतील दोन होळ्यांचा आगळावेगळा शिमगा

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील शिमगा अनेक विशेष परंपरामुळे वेगळेपण जपत आहे. या गावात एकाच वेळी दोन होळ्या तोडल्या जातात. एक होळी चाफवली गावातील सिमेवर ठेवली जाते, तिला ‘राज होळी’ म्हटले जाते. चाफवलीचे प्रमुख मानकरी होळी गावकर्‍यांच्या मदतीने देवळे चाफवली सिमेवर ठेवतात. ती रात्री देवळातील गावकरी देवळे गावात नेतात. ही होळी नेताना फाका मारल्या जातात. होळी देवळे येथे उभी केल्यानंतर देवळेतील इतर होळ्या मानवल्या जातात. राज होळी ठेवल्यानंतर मुख्य आंब्याची होळी तोडली जाते. ही होळी सुद्धा गावचे मुख्य मानकर्‍यांनी आंब्याच्या झाडाला घाव घालून दिल्यानंतर तोडली जाते. मांडावर नेण्यापूर्वी सुवासिनी शेंड्याला शिंपण करतात. पुजाअर्चा करुन पान सुपारीचा विडा ठेवून गोड नैवैद्य दाखवतात, मग पुन्हा ही होळी गावकरी नाचवत खेळवत मांडावर नेतात उभी करतात. होळीच्या मांडावर मुख्य मानकरी तसेच गावातील इतर भाविकांचे हात भेटीचे नारळ जाप (जप)करुन मानतात. नंतर मागील वर्षी बोललेले नवस येथे फेडले जातात तसेच नविन नवस बोलले जातत. असा हा चाफवली गावचा एकाच वेळी दोन होळ्या तुटणारा आणि तिसर्‍या दिवशी होणारा शिमगा आपलं वेगळेपण जपून आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg