loader
Breaking News
Breaking News
Foto

धाडसी पाठलाग अन अट्टल वाहन चोरटा तावडीत, गुढीपाडव्याच्या दिवशी वाहतूक पोलिसांची अफलातून कामगिरी

ठाणे (प्रतिनिधी) - गुढीपाडव्या दिनी नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहात सारे रंगले असताना वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कता आणि धाडसामुळे अट्टल वाहन चोरटा तावडीत सापडला आहे. संशयीत लक्ष्मण उर्फ आदित्य तुकाराम घुडे (रा. सरळगाव, ता. मुरबाड,) असे त्या चोरटयाचे नाव असुन उल्हासनगर युनीटमध्ये वाहतूक नियमभंगाच्या कारवाई दरम्यान खणखणलेल्या एका फोनमुळे चोरीच्या दुचाकीसह त्याला शिताफीने पकडण्यात वाहतुक पोलिसाला यश आले आहे. दरम्यान, प्राथमिक तपासात या चोरट्याच्या विरोधात वाहनचोरीचे ३० गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरुवार दि. १९ मार्च रोजी दुपारच्या सुमारास पोलीस हवालदार संतोष भोईर हे बिर्ला गेट ते दत्तवाडी रोड दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत होते. कारवाई पूर्ण करून ते कार्यालयात परतल्यानंतर दुपारी २.१९ वाजता ठाणे वाहतूक नियंत्रण कक्षाकडून उल्हासनगर हेल्पलाईनवर महत्त्वाची माहिती प्राप्त झाली. कारवाईदरम्यान थांबविण्यात आलेली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (MH-09-FW-4035) ही दुचाकी चोरीची असल्याची तक्रार एका वाहनधारकाने नोंदवल्याची माहिती मिळाली. वेळ न दवडता पोलिसांनी तात्काळ ठाणे नियंत्रण कक्षाशी समन्वय साधत घटनास्थळी धाव घेतली. अंबिका देशी बार समोर, शिव रोड येथे एक संशयित व्यक्ती दुचाकी घेऊन पसार होण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने दुचाकी सोडून धुम ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस हवालदार संतोष भोईर यांनी तत्परतेने पाठलाग करून त्याला जेरबंद केले.

टाईम्स स्पेशल

या दरम्यान झालेल्या झटापटीत भोईर यांच्या कपाळावर किरकोळ दुखापत झाली. ताब्यात घेतलेल्या संशयिताने आपले नाव लक्ष्मण उर्फ आदित्य तुकाराम घुडे (रा. सरळगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे) असे सांगितले. तपासादरम्यान दुचाकीचे मालक ओंकार बबन भरडे (रा. कोल्हापूर) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुचाकी चोरीला गेल्याची पुष्टी दिली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२२ (१) व ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या धाडसी आणि सतर्क कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे तसेच सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते पोलीस हवालदार संतोष भोईर यांचा विशेष पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती वाहतूक पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg