loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर वरचापाट येथे श्री देवी भैरी व्याघ्रांबरीचा समा उत्सव उत्साहात

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर वरचापाट येथील खोत पद्माकर महादेव भोसले यांच्या प्रांगणात श्री देवी भैरी व्याघ्रांबरीचा महोत्सव (समा) उत्साहात पार पडला. 'समा' याचा खरा अर्थ 'समाजासाठी समानता आणणारा उत्सव' असा असून तो साजरा करण्याची गुहागर तालुक्यात परंपरा आहे. समा उत्सवात देवीला गाऱ्हाणे घातल्यानंतर पालखीप्रमाणे असणाऱ्या उघड्या पण देवता नसणाऱ्या पालखीला दोन्ही बाजूंनी लोटली जाते. समा उत्सवाचे आयोजन गुहागर वरचापाट भंडारी ज्ञाती बांधवांनी केले होते. या उत्सवात तालुक्यातील भंडारी समाजातील ज्ञाती बांधव सहभागी झाले होते. यामध्ये अंजनवेल, वेळणेश्वर, पडवे, गुहागर खालचा पाट, गोयथळे, मोरे, आरे, नरवण, तवसाळ आगर, कारूळ, बाग, अडूर, तवसाळ, खालचापाट वराडकर, पालशेत, साखरी आगरआदी गावातील समाज बांधवांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर तालुक्यात होणाऱ्या समा लोटणी उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. आजही भंडारी समाज भक्तीभावाने व श्रद्धेने ही परंपरा जोपासताना दिसून येत आहे. समा महोत्सव हा उघड्या पालखीबरोबर लोटणी घेण्याचा प्रकार श्रद्धेचा असला तरी चित्तथरारक, आव्हानात्मक व अंगावर शहारे आणणारा असा होता. प्रामुख्याने भंडारी समाज ज्या भागात राहतो त्या ठिकाणी समा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा उत्सव पहाटेपर्यंत सुरू होता. उत्सवात सहभागी गाव प्रतिनिधी (खांदेलीं)चा गुहागर वरचापाट भंडारी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमादरम्यान भंडारी समाजातील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष नवनीत ठाकूर, गुहागर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रणव पोळेकर, उप सभापती निलेश सुर्वे, वरचा पाट येथील खोत पद्माकर भोसले, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण, गुहागर नगरपंचायतचे नगरसेवक उमेश भोसले, अमोल गोयथळे, श्रिया मोरे, समीर बागकर, पत्रकार गणेश किर्वे, सत्यवान घाडे आदी मान्यवरांचा गुहागर वरचापाट येथील भंडारी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg