loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, दोन दिवसांत होणार शिवसेनेत 'मेगा' पक्षप्रवेश

खेड - दापोली तालुक्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून, पुढील दोन दिवसांत मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मधील कार्यकर्ते आणि माजी लोकप्रतिनिधींची दुसरी फळी एकत्रितपणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या संभाव्य पक्षप्रवेशामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य नेहा युवराज जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, युवक अध्यक्ष विजय मुंगसे, आसूदचे उपसरपंच कडू तसेच पिंट्या माने यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घडामोडींमुळे दापोलीच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली असून, स्थानिक पातळीवर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, एका पक्षातील कार्यकर्त्यांची संपूर्ण दुसरी फळी माजी लोकप्रतिनिधींसह पक्षांतर करणार असल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशाबाबत अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, राजकीय वर्तुळाचे लक्ष आता या मोठ्या घडामोडीकडे लागले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg