देवरुख (प्रतिनिधी) - कर्ली देवघर येथील सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव व तालुक्याचे उपसभापती प्रफुल बाईत, सुरेश सप्रे यांनी ठेकेदार व संबधीत अधिकारी यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करून गावकरी याचेसमवेत बैठक घेतली. या बैठकीला कर्ली व देवघर गावातील ग्रामस्थांसह ठेकेदार सार्वजनिक बांधकामचे अधिकारी, पत्रकार आदी उपस्थित होते. कामाच्या दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही तसेच काम पावसापूर्वी पूर्ण करा अशा सूचना संबधितांना अधटराव यांनी दिल्या व कामाची संथ गतीवरून अधिकार्यांना कडक शब्दात सुनावले. कर्ली देवघर गावाला भेट देऊन तेथील सुरू असलेल्या सिमेंट कॉंक्रीट रस्ता कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. गुणवत्तेबाबत कडक भूमिका घेत रस्त्याच्या कामात गुणवत्तेत कोणीही तडजोड न करता काम करा असे अधटराव यांनी स्पष्ट केले. रस्त्यासाठी वापरले जाणारे मटेरियल उत्तम दर्जाचेच असावे. कामाचा दर्जा उत्तम असलाच पाहिजे, हे काम लवकरात लवकर पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. कर्ली-देवघर गावांमधील शाळकरी मुलांची रस्त्या बंद असल्याने कुचंबणा होत आहे. यावर तोडगा काढून पर्यायी रस्ता वाशी रावणंगवाडी रस्त्यावर डागडुजी करून एसटी सेवा चालू करुन घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. या पर्यायी रस्ता वाहतुकीस योग्य करून येत्या आठ दिवसात रावणंगवाडी मार्गे कर्ली सहाण अशी बससेवा सुरू केली जाईल, अशी ग्वाही अधिकारी व ठेकेदार यांनी ग्रामस्थांना दिली.
टाइम्स स्पेशल
सिंधुदुर्ग रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनची स्थापना; सोलर क्षेत्राच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार























































































































































































































































































































.jpg)






















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.