loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंढर येथे रंगला..."पालखी नृत्य सोहळा"

वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रमोदशेठ सिताराम गांधी यांच्यावतीने मुंढर मनसे शाखा कार्यालयासमोर पटांगणात "सनईचा मंजुळ स्वर, ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिबाजीत, रंगी बेरंगी फुलांची उधळण करीत, मुंढर गावची ग्रामदेवता स्वयंभू सोमेश्वर, वाघजाई, मानाई, कालकाई, काळीश्री, चंडिका देवीचा नामघोष करत दिमाखदार ग्रामदेवता स्वयंभू सोमेश्वर, वाघजाई देवीचा "पालखी नृत्य सोहळा" संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पालखी नृत्य सोहळ्याचे उद्घाटन मुंढर गावची ग्रामदेवता स्वयंभू सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद उर्फ मामा शिर्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व उद्योजक मंगेशशेठ गांधी यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोदशेठ गांधी, उद्योजक मंगेशशेठ गांधी, प्रमोद उर्फ मामा शिर्के, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, मनसे शेतकरी संघटना गुहागर ता. अध्यक्ष प्रसाद कुष्टे, ता.सचिव प्रशांत साटले, मुंढर मनसे शाखा अध्यक्ष सुजित गांधी, उपतालुका अध्यक्ष जितू साळवी, अमित खांडेकर, बबलू आग्रे, संदीप धनावडे, पत्रकार गणेश किर्वे, आशिष कारेकर,राहुल जाधव, आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या पालखी नृत्य सोहळ्यात श्री स्वयंभू सोमेश्वर पालखी नृत्य पथक, मुंढर, श्री खेम वरदान पालखी नृत्य पथक, पालपेणे, श्री चंडीकाई देवी पालखी नृत्य पथक, मळण, श्री देव गांगोबा करंबेळे ता. संगमेश्वर आदी संघ सहभागी झाले होते. पालखी नृत्य पथकातील सर्व कलाकारांचा यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या पालखी नृत्य सोहळ्याचे सूत्रसंचालन अमित आदवडे यांनी केले. शेवटी प्रमोद गांधी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg