loader
Breaking News
Breaking News
Foto

​विलवडे धरण परिसरातील बेकायदा क्वारी आणि क्रशर कायमचे बंद करा; आक्रमक ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे धाव

सावंतवाडी (प्रतिनिधी) - विलवडे धरण परिसरात अनधिकृतरीत्या सुरू असलेले दगडखाण (क्वारी) आणि क्रशर प्रकल्प कायमचे बंद करण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी विलवडे ग्रामस्थांनी सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे यांच्याकडे केली. या धोकादायक प्रकल्पांमुळे केवळ धरणच नव्हे, तर परिसरातील वनसंपदा आणि जंगली प्राणीही धोक्यात आले असल्याच्या वेदना ग्रामस्थांनी यावेळी मांडल्या. पर्यावरण अभ्यासक डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रशासनाच्या कारवाईनंतरही रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या ब्लास्टिंगबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ​प्रशासनाने यापूर्वी कारवाईचे निर्देश देऊनही विलवडे येथे बेकायदा काम सुरूच आहे. विशेषतः रात्री अडीचच्या सुमारास भीषण ब्लास्टिंग केले जात असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. या आवाजामुळे आणि हादऱ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​डॉ. जयेंद्र परुळेकर यावेळी म्हणाले की, "ज्या ठिकाणी या बेकायदा खाणी सुरू आहेत, तिथून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर दोन धरणे आहेत. हा संपूर्ण परिसर 'इको-सेन्सेटिव्ह झोन' मध्ये येतो. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन ठोस दखल घेत नसल्याने यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. येथे बिबटे आणि गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने हे प्रदूषणकारी प्रकल्प वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरणार आहेत." ​ग्रामस्थांनी मांडलेली वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रांताधिकारी समीर घारे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. "विलवडे परिसरातील निसर्गसंपदा पाहता तिथे प्रदूषणकारी प्रकल्पांऐवजी पर्यटन प्रकल्प होणे अधिक गरजेचे आहे. संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, खोदकाम आणि ब्लास्टिंगच्या परवानगीबाबत खनिकर्म विभाग व पोलीस प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याचे कळविण्यात आले आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी माजी उपसभापती कृष्णा सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. कृष्णा सावंत म्हणाले, लोक रस्त्यावर उतरले आहेत तरीही भूसुरुंग स्फोट सुरूच आहे. जनतेला गृहीत धरून शेतकरी लोकांना उध्वस्त केले जात आहे. हे सहन करणार नाही. दगड खाण प्रकल्प बंद झाले पाहिजे. या शिष्टमंडळात सुधीर सावंत, राजाराम दळवी, विलास सावंत, सीताराम दळवी, रवींद्र दळवी, संदेश सावंत, विठ्ठल दळवी, जितेंद्र दळवी, दत्ताराम सावंत, संदीप सावंत, रमेश दळवी, अक्षय सावंत, दिनेश सावंत, सुनील सावंत, प्रभाकर दळवी, दीपक देसाई, गोविंद सावंत, दत्ताराम दळवी, अरुण दळवी, विठ्ठल सावंत, संतोष सावंत, बळीराम सावंत, विजय दळवी, भालचंद्र गवस, हरी सावंत, भिवसेन दळवी, कृष्णा दळवी, विठ्ठल दळवी, जितेंद्र दळवी, दत्ताराम सावंत, संदीप सावंत, रमेश दळवी, अक्षय सावंत, दिनेश सावंत, सुनिल सावंत, प्रभाकर दळवी, दीपक देसाई, गोविंद सावंत, दत्ताराम दळवी, अरुण दळवी, विठ्ठल सावंत, संतोष सावंत, बळीराम सावंत, विजय दळवी, भालचंद्र गवस, हरी सावंत, भिवसेन दळवी, कृष्णा दळवी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg