भारतीय औषधनिर्माण शास्त्राचे जनक प्रो. एम. एल. श्रॉफ यांच्या १२४ व्या जयंतीचे आणि 'राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनाचे' औचित्य साधून सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये 'फार्मा अन्वेषण २०२६' हे राज्यस्तरीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात पार पडले. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत औषधनिर्माण क्षेत्रातील भविष्यातील संधी आणि आव्हानांवर सखोल मंथन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रो. एम. एल. श्रॉफ यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून झाली. विद्यार्थ्यानी स्वागतगीत सादर केले, तर प्रो. श्रॉफ यांच्या जीवनप्रवासावर आधारित विशेष ध्वनिचित्रफित दाखवून त्यांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पीसीआय प्रेसिडेंट डॉ.मोंटू कुमार पटेल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना औषधनिर्माण क्षेत्रातील बदलांचा वेध घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पीसीआयचे उपाध्यक्ष जशुभाई चौधरी, सदस्य विजय पाटील आणि श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या विशेष सत्रात इंडोको रेमेडीजच्या व्यवस्थापकीय संचालक अदिती कारे पणंदीकर आणि व्हर्गो फार्माचे डीजीएम हिमांक नार्वेकर यांनी औषध उद्योगातील नवीन प्रवाहांवर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी गोवा फार्मसी कौन्सिलचे रत्नदीप कुरतडकर, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनचे प्रा.प्रवीण जावळे, डॉ.विक्रम शिंदे, डॉ.संदीप शेळके, डॉ.सचिन कोतवाल तसेच डॉ. राजेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. दुपारच्या सत्रात विविध तांत्रिक स्पर्धा आणि चर्चांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पेटंट ओरल, पेटंट मॉडेल आणि पोस्टर प्रेझेंटेशनचे मूल्यांकन करण्यात आले. पीसीआय प्रतिनिधींसोबत विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक पार पडली. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि शैक्षणिक तज्ञ यांच्यात अनौपचारिक संवाद झाला.
यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे - मॉडेल प्रेझेंटेशन गटामध्ये यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी च्या साजन कांबळी याने प्रथम, समीक्षा मेस्त्री हिने द्वितीय तर हर्षल सूर्यवंशी याने तृतीय क्रमांक पटकावला. पेटंट पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये भोसले फार्मसी कॉलेजची सानिया शेख प्रथम, विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीची अपूर्वा कामत द्वितीय आणि भोसले कॉलेजचा महादेव धुरी याने तृतीय क्रमांक मिळवला. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत भारती विद्यापीठ कोल्हापूरची श्रुती किल्लेदार प्रथम, इंदिरा इन्स्टिट्यूट साडवलीची केतकी धाणे द्वितीय, तर गोविंदराव निकम कॉलेज सावर्डेची जुई पाटील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. तुषार रुकारी, डॉ.विनोद मुळे, प्रा. सत्यजित साठे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नमिता भोसले यांनी केले.























































































































































































































































































































.jpg)






















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.