loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबवली देऊळवाडी येथील श्री झोलाई क्रीडामंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेत भडगावचा श्रीकृष्ण संघ विजेता

खेड - खेड तालुक्यातील आंबवली-देऊळवाडी येथील झोलाई क्रीडा मंडळाच्या वतीने आई झोलाई मातेच्या ३९ व्या शिमगोत्सवानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेतील खुल्यागटांत भडगावच्या श्रीकृष्ण संघाने, तर ६० किलो वजनी गटात चाकाळेच्या जय हनुमान क्रीडामंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. खुल्या गटात मोहानेचा रघुवीर मानाई काळकाई संघ, चिंचघरचे नवनाथ क्रीडामंडळ, आंबवलीचे श्री झोलाई क्रीडामंडळ यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक पटकावले. ६० किलो वजनी गटात संयुक्त कोंड-दयाळने प्रथम, नवनाथ क्रीडामंडळ चिंचघर द्वितीय, व अष्टविनायक क्रीडामंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच कौशल चव्हाण उत्कृष्ट चढाई, सुशांत झुझम उत्कृष्ट पकड, सागर महाब्दी सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. तसेच घेण्यात आलेल्या मॅरेथॉन व नृत्य स्पर्धांमध्येही स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विजेत्यांना रोख पारितोषिक व चषक देवून गौरवण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री झोलाई क्रीडा मंडळाचे पदाधिकारी दिपक यादव, अंनत पवार, अनिल यादव, संदीप यादव, विकास यादव, संजय यादव, श्रीराम यादव, रमेश यादव, सुरेंद्र यादव, संतोष यादव, ऋग्वेद यादव, आर्यन यादव, गणेश यादव इतर सभासद व ग्रामस्थ यांनी अहोरात्र मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg