loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवई येथील ज्येष्ठ समाज नेत्या सुनेत्रा प्रकाश घोसाळकर यांचे आकस्मिक निधन

रत्नागिरी - कडवई दशक्रोशीचे ग्रामदैवत श्री वरदान देवी देवस्थानचे भूतपूर्व सरचिटणीस श्री. प्रकाश शंकर घोसाळकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनेत्रा प्रकाश घोसाळकर यांचे गुरु. दि. १९ मार्च रोजी रात्रौ दु:खद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय सुमारे ७० वर्षे इतके होते. सुनेत्रा घोसाळकर या अखेरपर्यंत हिंडत्या फिरत्या होत्या. परंतु अल्पशा आजाराने त्यांचे रात्रौ ११ वा. चे सुमारास आकस्मिक निधन झाले. सुनेत्रा घोसाळकर या कडवई दशक्रोशीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व होय. त्यांचे पती श्री. प्रकाश घोसाळकर यांचा श्री वरदान देवी देवस्थानच्या उभारणीत सिंहाचा वाटा आहे. ते देवस्थानच्या उभारणीत व्यग्र असताना त्यांना सुनेत्रा घोसाळकर यांचे फार मोठे पाठबळ होते. त्यांचे पाठबळ असल्याने श्री. प्रकाश घोसाळकर वरदान देवी देवस्थानसाठी अथक परीश्रम घेऊ शकले. सुनेत्रा घोसाळकर या कडवई पंचक्रोशीतील एक शांत व धार्मिक वृत्तीच्या बुजुर्ग भगिनी म्हणून सुपरिचीत होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी कोणताही गाजावाजा न करता सदैव सामाजिक कार्य केले. घोसाळकर व पवार कुळाचे धार्मिक रितीरिवाज त्या उत्तम प्रकारे जाणत असत. त्यामुळे लग्ने, साखरपुडा तसेच अन्य धार्मिक कार्यात त्या अग्रभागी राहून समाजबांधवांना मार्गदर्शन करीत. त्यांची अंत्ययात्रा शुक्र. दि. २० रोजी दुपारी १२ वा. त्यांच्या निवासस्थानाहून निघाली व त्यानंतर त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी घोसाळकर पवार बांधव, स्नेहीजन व आप्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कडवई दशक्रोशीत पसरताच तीव्र शोक व्यक्त करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

दै. ‘रत्नागिरी टाइम्स’चे संपादक श्री. उल्हास घोसाळकर तसेच रत्नागिरीतील श्रीराम मंदिर व मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी सांगितले, ‘‘सुनेत्राताईंचे सामाजिक कार्य शांतपणे सदैव सुरु होते. समाजबांधवांना त्या अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करीत. त्यांनी आपल्या कार्याचा कधीच गाजावाजा केला नाही. घोसाळकर व पवार कुळाच्या रितीरिवाजांची त्यांना उत्तम माहिती होती व त्या सदैव मार्गदर्शन करीत. त्यांच्या निधनाने त्यांची उणीव सर्व समाजबांधवांना भासेल. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही परमेश्‍वर चरणी प्रार्थना’’ अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg