loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनची स्थापना; सोलर क्षेत्राच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार

मालवण (प्रतिनिधी) - गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोलर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांच्या सिंधुदुर्ग रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष कोरगावकर यांची तर सचिवपदी किशोर दाभोलकर यांची तसेच खजिनदारपदी बाळकृष्ण सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्ह्यातील सोलर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांची कुडाळ येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत “सिंधुदुर्ग रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन” ची अधिकृत स्थापना करण्यात आली. या बैठकीस प्रवीण सावंत, श्रीपाद खोबरेकर, लतेश चोपडेकर, सिद्धेश मोबारकर, विशाल साटम तसेच आशुतोष पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले सोलर व्यावसायिक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिन्यूएबल एनर्जी क्षेत्राचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधणे, सोलर व्यावसायिकांमध्ये समन्वय व सहकार्य वाढविणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध ऊर्जा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संघटित पद्धतीने कार्य करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. शेवटी खजिनदार बाळकृष्ण सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg