ठाणे (प्रतिनिधी) - रेकॉर्ड वरील सराईत गुंड व ठाणे स्टेशन परिसरात पोलिसांवर हल्ला करणारा नितेश शिंदे उर्फ टकल्या यास कापूरबावडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर चेन स्नॅचिंग आणि ड्रग्स तस्करीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 मार्च रोजी दोन गटात वाद होऊन गॅंगवारची घटना समोर आली होती. यावेळी संशयीत आरोपी नितेश शिंदे उर्फ टकल्या याने अनेकांना धमकावले होते. त्यानंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. तर याच गुंडांचे बंदूक सोबतचा व्हिडिओ आणि फोटो यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर कापूरबावडी पोलिसांनी सदर गुंडावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. विशेष म्हणजे तो 15 दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता.























































































































































































































































































































.jpg)






















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.