loader
Breaking News
Breaking News
Foto

तांबी–तांबडवाडी–रावळगाव निर्व्हाळ खरवते रस्त्यासाठी १.५० कोटींचा निधी मंजूर, आम. भास्कर जाधव यांचे आभार

वरवेली (गणेश किर्वे) - चिपळूण तालुक्यातील तांबी–तांबडवाडी–रावळगाव निर्व्हाळ खरवते या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्गीकरण करून नूतनीकरण करण्यासाठी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रकाशराव जाधव, शशिकांत चव्हाण, मोहन जाधव यांच्यासह दोन्ही ग्रामस्थांनी शिवसेना नेते तथा माजी मंत्री, आमदार भास्करराव जाधव यांच्याकडे ही मागणी वारंवार मांडली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मागणीची दखल घेत आमदार भास्करराव जाधव यांनी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्व्हाळ खरवते –रावळगाव रस्त्यासाठी सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीमुळे रस्त्याच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल दोन्ही गावांच्या वतीने शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक शशिकांत चव्हाण यांनी आमदार भास्कर जाधव यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले. ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg