loader
Breaking News
Breaking News
Foto

किरण तायडे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

खेड - काँग्रेस पर्यावरण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तसेच भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस (महाराष्ट्र युवक) अध्यक्ष किरण संजय तायडे यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रसंगी बोलताना किरण तायडे म्हणाले की, “आज माझा पुनर्जन्म झाल्यासारखे वाटत आहे. माझे अखंड आयुष्य वंचित घटकांच्या विकासासाठी अर्पण करणार असून समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शासकीय, खाजगी, व्यावसायिक व रोजगार विषयक प्रश्नांवर मार्गदर्शन व मदत करण्यासाठी कटिबद्ध राहीन.” प्रसंगी कोकण निरीक्षक डॉ. सुशीम सकपाळ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पक्षप्रवेशासाठी कोकण प्रदेश प्रमुख सुदर्शन सकपाळ, सूर्यकांत तांबे, सुरज तांबे सागर जाधव, राजेश मर्चंडे, बी. जी. गमरे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी विनोद तांबे, प्रमोद मोहिते, अक्षय येलवे, सुरेंद्र कापसे, राजेश कदम, कृष्णा राठोड, धर्मेश कांबळे, रुपेश कदम, विश्वादीप मोहिते, निखिल गमरे, आदिवासी समाजाचे अध्यक्ष प्रमोद निकम, तालुका अध्यक्ष रमेश कदम, नरेश जाधव, प्रतीक जाधव, तृप्ती तायडे, सुलभा मोहिते, सोनाली मोहिते, आदित्य कदम आदींनीही वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg