loader
Breaking News
Breaking News
Foto

मंत्री आदितीताई तटकरे यांनी केले कशेडी मठामध्ये श्री स्वामींचे विधिवत अभिषेक व पूजन

खेड (दिलीप देवळेकर) - श्री स्वामी समर्थ मठ कशेडी बंगला येथे श्री स्वामी समर्थ प्रगटदिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी कशेडी मठामध्ये श्री स्वामींचे विधिवत अभिषेक व पूजन केले. यानिमित्ताने कशेडी मठाचे वतीने आदितीताईंचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कशेडी गावचे सरपंच श्री संजय दरेकर माजी सरपंच श्री सुरेन्द्रआप्पा दरेकर मठाचे विश्वस्त संजय मोरे, मठाचे व्यवस्थापक समिर मोरे व माजी उपसभापती विश्वासराव दळवी हे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी असंख्य स्वामी भक्तांनी प्रगटदिनानिमित्त स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. कशेडी मठ हे डोंगराळ भागात वसलेले असल्याने येथील परिसरात विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी मठाचे वतीने तसेच कशेडी ग्रा पं वतीने प्रयत्न करणेचे ठरवले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg