loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये आरोग्य सुविधांना बळकटी देण्याचा प्रयत्न; नगरपरिषद रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू करण्याची मागणी

खेड (प्रतिनिधी) - खेड शहरातील वाढत्या आरोग्य गरजांच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये आरोग्य सुविधांना अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. खेड नगरपरिषद रुग्णालयात डायलिसिस सेवा सुरू करण्याची मागणी पुढे आली असून यामुळे किडनी आजारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना गटनेते व नगरसेवक निकेतन अनंत पाटणे यांनी या संदर्भात संबंधित रुग्णालय प्रशासनाला सविस्तर पत्र देत ही मागणी मांडली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, खेड नगरपरिषदेतर्फे शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णालय कार्यान्वित करण्यात येत आहे. या रुग्णालयाचे व्यवस्थापन ‘वाय रत्नाबाई घरडा हॉस्पिटल’मार्फत करण्यात येणार असून, आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या आणि किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता, डायलिसिससारखी अत्यावश्यक सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. सध्या अनेक रुग्णांना डायलिसिस उपचारासाठी खेडबाहेर जावे लागत असून त्यासाठी वेळ, पैसा आणि शारीरिक श्रम यांचा मोठा ताण सहन करावा लागतो. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण ठरत आहे. त्यामुळे नगरपरिषद रुग्णालयातच डायलिसिस युनिट सुरू केल्यास रुग्णांना त्वरित आणि दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर मिळू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

याशिवाय, या उपक्रमामुळे खेड शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि नागरिकांचा सरकारी आरोग्य सेवांवरचा विश्वास वाढेल, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे. सदर मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली असून, लवकरच या बाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg