बांदा (प्रतिनिधी) - वाफोली ग्रामपंचायतीत जल जीवन मिशन अंतर्गत नुकताच जलमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जलसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित विविध उपक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमातून पाणी बचतीचा प्रभावी संदेश देण्यात आला. वाफोली ग्रामपंचायतीच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित जलमहोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव व उपसभापती गौरव मुळीक यांच्या हस्ते करण्यात आला.
जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जलदिंडी, जलपूजन, तसेच जलशपथ यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश होता. महिलांनी जलकलश घेऊन काढलेल्या मिरवणुकीत ग्रामस्थ, पदाधिकारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना सभापती व उपसभापती यांनी वाफोली येथे जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामाचे कौतुक केले आणि सर्वांनी पाणी बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित सदस्य नितीन राऊळ तसेच पंचायत समिती सदस्य महेश धुरी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, पाणी व स्वच्छता विभागाचे समिल नाईक, ग्रामपंचायत अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सूत्रसंचालन पंचायत समितीच्या कृषी अधिकारी शुभदा सावंत कविटकर यांनी केले. या जलमहोत्सवात ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, महिला बचत गट, शिक्षक, विद्यार्थी, तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.























































































































































































































































































































.jpg)






















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.