loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा 11 जानेवारीला गुणीजन शिक्षक पुरस्कार सोहळा

देवळे (प्रकाश चाळके) - महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटने मार्फत दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील गुणीजन शिक्षक आणि शिक्षिका यांना तालुका निहाय पुरस्कार दिले जातात. यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले असून रविवार दिनांक 11 जानेवारी 26 रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा कै. यशवंतराव माने माध्यमिक विद्यालय निवळी तिठा तालुका - जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी संपन्न होणार आहे. रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वा. कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेंद्र यशवंतराव माने अध्यक्ष रत्नसिंधू शिक्षण प्रसारक संस्था रत्नागिरी हे असून सकाळी 10.00 ते10.30 नाव नोंदणी व चहा सकाळी 10.30 ते 12.30 वा. गुरुसखा रामनाथ दादा मोते, स्मृती पुरस्कार वितरण सोहळा. दुपारी 12:30 ते 1.00 अनुदानित शाळा वाचवण्यासाठी संघटनेचे संघटनेचे कार्य, राज्य अध्यक्ष सुधीर घागस यांचे मार्गदर्शन. दुपारी 1.00 ते 2.00 भोजन व कार्यक्रमाचा समारोप.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुरस्कार प्राप्त जिल्हा गुणीजन शिक्षक आणि शिक्षिका पुढील प्रमाणे राजापूर तालुका, जयवंत श्रीपती नायकवडे सरस्वती विद्या मंदिर पाचल, आशालता विजय सावंत, राजापूर हायस्कूल राजापूर, लांजा तालुका रवींद्र चंद्रकांत वासुरकर, न्यू इंग्लिश स्कूल लांजा, नेहा नंदकुमार पाटोळे, जगन्नाथ गंगाराम पेंडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, रत्नागिरी तालुका रणजीत वासुदेव गद्रे रा.भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी, शितल हरीश सामंत, स्वामी स्वरूप आनंद विद्यामंदिर पावस, संगमेश्वर तालुका मिलिंद नारायण शहाणे न्यू इंग्लिश स्कूल वाशीतर्फे संगमेश्वर, मनाली लक्ष्मीकांत जाधव, माध्यमिक विद्यामंदिर ताम्हणे, चिपळूण तालुका आनंदा धोंडीराम घाटगे, ह भ प श्री.आ . बा.माध्यमिक विद्यालय नायशी, राखी गणेश भुरण आर .सी .काळे माध्यमिक विद्यालय पेढे परशुराम, गुहागर तालुका विनायक तुकाराम जाधव श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर, मनीषा अनिल सावंत श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर, खेड तालुका विवेकानंद गोविंद कांबळे, श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, अंजना प्रमोद टकले एल.पी. इंग्लिश स्कूल खेड, दापोली तालुका हेमंत गोविंद शिगवण कै. कमलाकर जनार्दन तथा भाई जावकर विद्यामंदिर तेरे वांगणी, मानसी प्रदीप अभ्यंकर ए.जी.हायस्कूल व जुनिअर कॉलेज दापोली, मंडणगड तालुका तानाजी मोतीराव याचावाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व जुनिअर कॉलेज मंडणगड, उषा आबासाहेब हुलगे न्यू इंग्लिश स्कूल निगडे, या सर्व शिक्षकांना 2025/26 चा पुरस्कार जाहीर झाला आहे.

टाइम्स स्पेशल

तसेच सेवानिवृत्त संघटना विशेष कार्य पुरस्कार दामोदर परशुराम लिंगायत, प्रकाश भिकाजी कुंभार, काशिनाथ चव्हाण, सुरेश पांडुरंग भंडारी, विलास विठ्ठल खोत, यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्याचे प्रेषक राज्य उपाध्यक्ष उत्तम गणपती कांबळे, कोकण विभाग उपाध्यक्ष रमेश निवृत्ती जाधव, कोकण विभाग उपाध्यक्ष आनंद लल्लन त्रिपाठी, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राहुल रमेश सप्रे, रत्नागिरी जिल्हा कार्यवाह महेंद्र विठोबा कुवळेकर, दक्षिण विभाग अध्यक्ष अभिजीत सप्रे, उत्तर विभाग अध्यक्ष महिंद्र जाधव, दत्तवाडी स्मारकाचे प्रमुख प्रसाद पंगेरकर, हे असून या सोहळ्याचे स्वागोतोत्सुक रत्नागिरी तालुका कार्यकारणी अध्यक्ष महेंद्र शांताराम शिंदे, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव धनाजी शंकर पाटील व सर्व कार्यकारणी सदस्य व सल्लागार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg